Smartphones Camera : आयफोनपासून सुरुवात : दिग्गज स्मार्टफोन कंपनी अॅपले सर्वप्रथम आपल्या आयफोनमध्ये डाव्या बाजूला कॅमेरा देण्यास सुरुवात केली होती. यानंतर, हळूहळू बहुतांश कंपन्यांनी हाच पॅटर्न स्वीकारला आणि कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला शिफ्ट केला. कॅमेरा डाव्या बाजूला ठेवणे, हे डिझाईन नसून त्यामागे खूप रंजक कारण आहे.
डाव्या बाजूच्या कॅमेराचे कारण : जगातील बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा स्थितीत मोबाईलच्या मागे डाव्या बाजूला बसवलेल्या कॅमेराने फोटो काढणे किंवा व्हिडीओ काढणे सोपे जाते. याशिवाय मोबाईल फिरवून लँडस्केप मोडमध्ये फोटो काढताना मोबाईलचा कॅमेरा वरच्या बाजूला राहतो, त्यामुळे लँडस्केप मोडमध्येही फोटो सहज काढता येतो. या कारणांमुळे मोबाईलमधील कॅमेरा डाव्या बाजूला ठेवला जातो.